Monday, July 22, 2024
Homeक्राईमKoyta Attack in Pune : पुण्यात पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर...

Koyta Attack in Pune : पुण्यात पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर कोयता हल्ला!

सदाशिव पेठेतल्या ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती?

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोयता गँग सक्रिय झाली असून पुण्यात शिकायला आलेल्या तरुणींवर एकतर्फी प्रेमातून टोकाला जाण्याच्या घटनाही घडत आहे. मागील वर्षी पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर अशाच प्रकारे कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, एका युवकाने हल्लेखोराला अडवल्यामुळे सुदैवाने ती तरुणी बचावली. पुण्यात याच घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली आहे. एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुण्यात कोयता हल्ल्याच्या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे. इयत्ता ११वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन २ तरुणांनी पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. खडक पोलीस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि अल्पवयीन मुलगी हे दोघे ही एकमेकांना ओळखतात. दरम्यान मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता त्याने झालेल्या वादातून त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे असलेल्या नागरिकांनी हे पाहताच आरडा ओरड केली आणि या तरुणांनी तिथून पळ काढला.

अल्पवयीन मुलीकडून अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आलेली नसली तरी सुद्धा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून गुन्हा दाखल केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -