मुंबई: जगभरात अनेक ठिकाणी नोकऱ्यांमध्ये कपात होत आहे. जागतिक स्तरावर आर्थिक सुस्ती आणि आर्टिफिशिय इंटेलिजन्समुळे टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली जात आहे. २०२३च्या अखेरीस सुरू झालेली ही कपात अद्याप सुरूच आहे. याशिवाय नव्या नोकरीच्या संधीही गायब आहेत. दरम्यान, एकीकडे असे सुरू असले तरी अशी काही सेक्टर आहेत ज्यांच्यावर या आर्थिक सुस्तीचा परिणाम होत नाही आहे आणि तेथे नोकऱ्यांमध्ये कपात होत नाही आहे.
कॉस्ट कटिंग आणि वर्कफोर्स मॅनेजमेंटच्या नावाने काढले जातायत लोक
आयटी कंपन्यांमध्ये नोव्हेंबर २०२३ पासून कपात सुरू होती. अल्फाबेट इंकने वर्ष २०२४च्या सुरूवातीला कर्मचाऱ्यांची कपात करून वाईट बातमी दिली होती. याशिवाय अॅपल, अॅमेझॉन, मेटा, डेल, एरिकसन, सिस्को आणि सॅप सारख्या मोठ्या कंपन्या सातत्याने लोकांना बाहेरचा रस्ता दाखवत आहे.
या क्षेत्रात नोकरीची चांगली शक्यता
२०२४ वर्षात सोशल सर्व्हिस, हेल्थकेअर, रिटेल,फूड, हॉटेल आणि रिअल इस्टेटसारख्या सेक्टरमध्ये कपात हा शब्द ऐकूही येत नाही आहे. येथे नव्या लोकांची भरती सुरू आहे. सोबतच चांगले अप्रेजल देऊन प्रतिभावान लोकांना घेतले जात आहे. मार्केटमध्ये फार्मा कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सोबतच हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल स्टाफची मागणी वाढत आहे. सरकारही हेल्थकेअर सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मदत करत आहे.
रिटेल आणि हॉटेल इंडस्ट्रीही वेगाने वाढतेय
आकड्यांनुसार भारतीय रिटेल सेक्टरमध्ये आवश्यक गोष्टींची डिमांड २०२७ पर्यंत १.१ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा वेगाने वाढत आहे. २०३४ पर्यंत हा आकडा २ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.






