Sunday, May 11, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health Tips: जाणून घ्या ब्रश करण्याची योग्य पद्धत, नाहीतर वेळेआधी पडतील तुमचे दात

Health Tips: जाणून घ्या ब्रश करण्याची योग्य पद्धत, नाहीतर वेळेआधी पडतील तुमचे दात

मुंबई: दिवसातून दोन दिवस ब्रश केले पाहिजे. दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश करणे अतिशय गरजेचे आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का ब्रश करण्याची योग्य पद्धत? ब्रश करण्याची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. काहीजण बराच वेळ दात घासत बसतात. तर काही लोकांच्या मते एक ते दोन मिनिटे दात घासणे पुरेसे आहे.


एका रिपोर्टनुसार दातावर जमलेली घाण स्वच्छ करण्यासाठी दररोज ३ ते ४ मिनिटे ब्रश केले पाहिजे. त्याचवेळी दातांवर जमलेली घाण स्वच्छ होते. डेंटिस्टच्या माहितीनुसार दररोज २ मिनिटे ब्रश करणे चांगले असते. सोबतच ब्रश करण्यासाठी सॉफ्ट ब्रशचा वापर केला पाहिजे.


अधिक नव्हे तर २ मिनिटे ब्रश करण्यासाठी दातांवर जमलेली घाण स्वच्छ केली जाईल. दातांवर जमलेला प्लाक बॅक्टेरिया, व्हायरस जर नाही हटवले तर ते हळू हळू घट्ट होतात.


दातांवर जमलेले बायोफिल्म कडक असतात जर यांना ब्रशच्या मदतीने हटवले नाही तर यामुळे त्रास होऊ शकतो.


ब्रश करताना एक गोष्ट ध्यानात ठेवा की ब्रश सॉफ्ट असले पाहिजे. नाहीतर हिरड्यांना जखम होऊ शकते. यामुळे हिरड्यांमध्ये सूजज आणि अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

Comments
Add Comment