Wednesday, May 14, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

MPSC PSI Exam : लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा ढकलल्या पुढे

MPSC PSI Exam : लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा ढकलल्या पुढे

कसं असेल नवं वेळापत्रक?


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्वाचा निर्णय घेतला असून, पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात (Physical Testing Program) बदल करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस मुख्यालय (Navi Mumbai Police Headquarters) येथे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यावेजी २९, ३० एप्रिल आणि २ मे रोजी या चाचण्या होणार आहेत. १५ ते १७ एप्रिल रोजी होणार्‍या चाचण्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.


लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या दरम्यान सात टप्प्यात होत आहे. तर निकाल ४ जूनला जाहीर होतील. त्यामुळे या दरम्यान MPSC च्या होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे.


याबाबत एमपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक १५ ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम निश्चित करताना लोकसभा निवडणूकीतील मतदानाचे टप्पे विचारात घेऊन त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. तथापि भारतीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निवेदने विचारात घेता दिनांक १९, २६ व २७ एप्रिल २०२४ रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अनुक्रमे दिनांक २९, ३० एप्रिल २०२४ व २ मे २०२४ या दिवशी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे एमपीएससीकडून सांगण्यात आले आहे.



वेळापत्रकात असा बदल


१९ एप्रिलचा ग्राउंड २९ एप्रिलला होणार आहे.
२६ एप्रिलचा ग्राउंड ३० एप्रिलला होणार आहे.
२७ एप्रिलचा ग्राउंड २ मे रोजी होणार आहे.

Comments
Add Comment