Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीअवजड वाहनांसाठी भायखळा पूल बंद; वाहतूक कोंडीत भर

अवजड वाहनांसाठी भायखळा पूल बंद; वाहतूक कोंडीत भर

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील बरेचसे ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्यामुळे बंद करावे लागले आहेत. त्यात आता सोमवारपासून भायखळा स्थानकाबाहेरील पूल अवजड वाहनांसाठी बंद केल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. सर्व बसमार्ग पुलाखालून अरुंद मार्गाने नेण्यात आल्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. त्यात येणाऱ्या काही दिवसांत सायन स्थानकातील रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर मुंबईत दीड ते दोन वर्षे वाहतुकीचा खेळ खंडोबा होणार आहे.

अंधेरी येथील गोखले पूल, रे रोड पूल, कर्नाक पूल व घाटकोपर येथील लक्ष्मी नाला पूल हे पूल गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांसह बेस्ट उपक्रमाला फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, तीन पूल बंद त्यात सायन पूल बंद केल्याने मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सायन पुलाचे पाड काम हाती घेतल्यानंतर या रोड ओव्हर पुलावरून जाणाऱ्या बेस्टच्या २० ते २२ बसेसना फटका सहन करावा लागणार आहे. सायन पुलाच्या कामासाठी वाहतूक बंद केल्यानंतर बसेस २० ते २२ हे बस मार्ग वळवण्यात येतील, तर काही बंद करण्यात येणार असल्याने बेस्ट उपक्रमाला प्रवाशांसह आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

अंधेरी येथील गोखले उड्डाणपूल गेली दोन ते तीन वर्ष बंद आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व ते पश्चिम थेट संपर्क तुटला आहे. त्यामुळे बऱ्याच बेस्ट बसच्या मार्गात बदल करावा लागला आहे. तर काही बस मार्ग खंडित करावे लागले आहेत. काही बस मार्ग तर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. बस क्रमांक ए १८०, २९० मर्यादित, ए ३५९, २५५ हे बस मार्ग जोगेश्वरी उड्डाण पुलावरून प्रवर्तित केले असून बस क्रमांक ५३३ मर्यादित हा अंधेरी पश्चिम ऐवजी पूर्वेकडे खंडित करावा लागला आहे. बस क्रमांक ४२२ हा मिलन सबवे उड्डाण पुलावरून पश्चिमेकडे नेणे भाग पडले आहे. बस क्रमांक ३२८, ३३६ व १८२ हे बस मार्ग पूर्णपणे बंद करावे लागले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -