Saturday, April 19, 2025
HomeदेशAyodhya Ram Mandir: महाराष्ट्र ते अयोध्या केवळ साडेपाच तासांचा प्रवास

Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्र ते अयोध्या केवळ साडेपाच तासांचा प्रवास

भाविकांसाठी ‘ही’ खास सुविधा

अयोध्या : अनेक वर्षांपासून अयोध्या राम जन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. २०२४ साली अयोध्येत रामलल्ला मूळ गर्भगृहामध्ये विराजमान झाले, त्यामुळे अयोध्या नगरीचं वेगळं रुप सर्वांसमोर आल आहे. देशभरातून अनेकांचे पाय या तीर्थक्षेत्राकडे वळले आहेत. तसेच परदेशी पर्यटकांनीसुद्धा ही अयोध्यानगरी पाहण्यासाठीची उत्सुकता दाखवली.

देशातील रेल्वे विभागानंही विविध राज्यांतून अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून दिले आणि विमानसेवा पुरवणाऱ्या संस्थाही यात मागे राहिल्या नाहीत. याच अयोध्येत पोहोचण्यासाठीचा महाराष्ट्रातून सुरु होणारा प्रवासही आता अधिक सुलभ आणि सुकर झाला आहे. पर्यटक आणि भाविकांचा रामलल्ला अयोध्यानगरी साठीचा २१ तासांचा हा प्रवास आता केवळ साडेपाच तासांत पूर्ण करता येणार आहे.

असा करता येणार प्रवास

इंडिगोने (Indigo) अयोध्यानगरी प्रवासासाठी ७२ आसनक्षमता असणारं विमान सुरू केलं आहे. राज्यातील नाशिक विमानतळाहून सोमवारपासून थेट लखनऊ फ्लाइट सुरू झाल्याने आता नाशिककरांना आणि पर्यायी महाराष्ट्रातील नागरिकांना अवघ्या साडेपाच तासांत अयोध्येला पोहचता येणार आहे. नाशिक-नागपूर फ्लाइटचा सेवा विस्तार लखनऊ पर्यंत केल्यामुळे नागपूरमध्ये जाऊन विमान बदलण्याची गरज भासणार नाही.

नाशिक विमानतळावरून दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी नागपूरकरता विमान उड्डाण करेल. जे नागपूर विमानतळावर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तेथून हे विमान लखनऊला रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. विशेष म्हणजे रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास करण्यासाठी किमान दोन हजार रुपये मोजावे लागतात, तर विमानसेवेसाठी जवळपास ३७०० ते ४२०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत, त्यामुळे अनेकांना ही तिकीटं खर्चाच्या बाबतीतही महाग वाटत नाहीयेत.

या मार्गावर सोमवारी पहिल्याच विमानाचं उड्डाण झालं असून, प्रवाशांनी या सेवेला कमाल प्रतिसाद दिला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर हजारो नाशिककर अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे हे नक्की.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -