मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने हट्टाने मुंबईतील सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघ स्वत:ला मागून घेतले आहेत. पण ठाकरे गटाची ताकद पूर्वीइतकी राहिलेली नाही. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने उभे केलेल्या पाचही उमेदवारांचा पराभव होईल, असे संजय निरुपम यांनी म्हटले.
मी हे भाकीत आत्ताच करुन ठेवत आहे. मुंबईतील एकाही मतदारसंघात ठाकरे गट जिंकू शकत नाही. हे माझे चॅलेंज आहे. २०२२ पूर्वी असणारी शिवसेना आता राहिलेली नाही. ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. त्याचा कोणताही विचार न करता उबाठा गटाने मुंबईतील लोकसभेच्या पाच जागा मागून घेतल्या आहेत.
मात्र, या सर्व ठिकाणी ठाकरे गटाचा पराभव होईल, असे निरुपम यांनी म्हटले. यावेळी संजय निरुपम यांनी मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे गटात लोकसभेच्या जागांचे समसमान वाटप न झाल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली.