Friday, October 31, 2025
Happy Diwali

Navi Mumbai MIDC Fire : नवी मुंबईतील एमआयडीसीमध्ये भीषण आग!

Navi Mumbai MIDC Fire : नवी मुंबईतील एमआयडीसीमध्ये भीषण आग!

अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आगीची (Navi Mumbai MIDC Fire) घटना घडली आहे. आज सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीमध्ये (Navabharat Industrial Chemical Company) ही आग लागली आणि रस्त्यावर पसरलेल्या रसायनांमुळे आजूबाजूच्या भागात ही आग पसरली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. आगीचे लोट हे रस्त्यापर्यंत पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक देखील आगीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >