इस्तांबूल : तुर्कीमध्ये इस्तांबूलमधील एका नाईटक्लबमध्ये नूतनीकरणाचे काम सुरु होते. यावेळी लागलेल्या आगीत २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी झाले असून यातील सात लोकांची स्थिती बिकट असल्याचं सांगण्यात येत आहे.
गव्हर्नर ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल इस्तांबूलच्या बेसिक्टस जिल्ह्यातील ही घटना आहे.
हा प्रदेश यूरोपच्या बाजूला येतो. सर्व पीडित हे नाईटक्लबमध्ये काम करणारे मजूर आहेत.