मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४साठी काँग्रेसने महाराष्ट्रात ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.
पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या विधानानुसार जन प्रतिनिधी अधिनियम १९५१च्या कलम ७७(१)नुसार महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. १९ एप्रिलला लोकसभेचा पहिला टप्पा होणार आहे.
महाराष्ट्राचे हे दिग्गज नेते करणार प्रचार
गांधी कुटुंबाशिवाय रमेश चेनिथाला, नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, इमरान प्रतापगढी, माणिकराव ठाकरे, वर्षाताई गायकवाड, सतेज पाटील, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे आणि आरिफ नसीम खान यांना स्टार प्रचारकांच्या यादीत सामील करण्यात आले आहे.
संजय निरूपम, अलका लांबा, कन्हय्या कुमार यांनाही बनवले स्टार प्रचारक
याशिवाय कुणाल पाटील, विलास मुट्टेमवार, संजय निरूपम, नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजीत कदम, कुमार केतकर, भाईचंद्र मुंगेकर, अशोक जगताप, वसंत पुरके, मुझफ्फर हुसैन, अभिजीत वंजरी, अतुल लोढे, रामहरी रूपनवार, अशोक पाटील, कन्हैया कुमार, पवन खेडा, अलका लांबा, श्रीनिवास बी.वी आणि वरूण चौधरीही महाराष्ट्रात प्रचार करताना दिसतील.