Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकतील

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकतील

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी वाचली पंतप्रधानांच्या कार्याची जंत्री

परभणी : पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra modi) मोदी यांनी गेल्या १० वर्षांमध्ये जगाला तोंडात बोटे घालायला लावणारी कामगिरी केली आहे. त्यांनी देशातील २५ कोटी लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले. गेल्या १० वर्षांमधील ही कामगिरी म्हणजे फक्त ट्रेलर आहे. येत्या ५ वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकतील, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadanvis) यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव गेला. महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस याठिकाणी आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना महादेव जानकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुक्तकंठाने पंतप्रधान मोदी यांची तारीफ केली. आधी महादेव जानकर यांचे कौतुक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात कशाप्रकारे आमुलाग्र बदल केले, याची जंत्रीच वाचली.

गेल्या १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारत बदलल्याचे फडणवीस यांनी सांगितले. २०१४ पर्यंत प्रत्येकजण गरिबीविषयी बोलायचा, पण देशात पहिल्यांदा कोणी खऱ्या अर्थाने गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या १० वर्षांमधील भारताची कामगिरी पाहून संपूर्ण जग आश्चर्याने तोंडात बोटे घालत आहे. गेल्या १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर काढले. जगातील अर्थतज्ज्ञ म्हणतात की, भारतामध्ये हे काय आश्चर्य झाले. जे विकसित देशांना जमले नाही, ते मोदींनी करुन दाखवले असल्याचे फडणवीस यांनी यावेळी म्हणाले.

हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है

मोदीजींनी हे कसे केले, हा प्रश्न सगळ्यांना पडला. पंतप्रधान मोदींना हे जमले कारण, त्यांनी मुठभर लोकांसाठी काम केले नाही. त्यांनी गरिबांच्या घरात वीज,पाणी,सिलेंडर या सुविधा मिळतील, हे पाहिले. तसेच आमच्या महिलांना शौचालय, मुद्रा लोन, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासातंर्गत तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केले. मोदीजी म्हणतात की, १० वर्षांमध्ये देशात झालेले हे परिवर्तन हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्याप्रकारे बदलणार आहे, त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -