Tuesday, December 10, 2024
Homeदेश90 years of RBI : आरबीआयच्या ९० व्या वर्धापन दिन सोहळ्याला पंतप्रधान...

90 years of RBI : आरबीआयच्या ९० व्या वर्धापन दिन सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती

मुंबईतील एनसीपीए येथे कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) यावर्षी ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या नरिमन पॉइंट (Nariman Point) येथील एनसीपीए (NCPA) या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांसह अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das), राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नरिमन पॉइंट परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ अंतर्गत करण्यात आली आणि १ जानेवारी १९४९ रोजी तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. या ९० वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. सध्या पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. ते सातत्याने जाहीर सभा घेत असून, त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांना देत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केंद्र सरकार, राज्य सरकारे, व्यापारी बँका, राज्य सहकारी बँकांसाठी बँकर म्हणून काम करते. रुपयाच्या विनिमय मूल्याची स्थिरता राखण्यात RBI महत्त्वाची भूमिका बजावते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारताच्या सदस्यत्वाच्या बाबतीत सरकारचे एजंट म्हणून काम करते. रिझव्र्ह बँक विविध प्रकारची विकासात्मक आणि प्रचारात्मक कामेही करते. याशिवाय, रिझर्व्ह बँक भारत सरकारचे कर्ज कार्यक्रम देखील हाताळते.

भारतात, एक रुपयाची नाणी आणि नोटा सोडून इतर चलन जारी करण्याचा एकमेव अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. केंद्र सरकारचे एजंट म्हणून, रिझर्व्ह बँक एक रुपयाच्या नोटा आणि नाणी तसेच सरकारने जारी केलेली छोटी नाणी देखील प्रसारित करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -