Wednesday, July 9, 2025

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील परिसरात पोलिसांचे रुट मार्च

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील परिसरात पोलिसांचे रुट मार्च

पनवेल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी पनवेल शहर ते करंजाडे पोलीस चौकी असा रुट मार्च काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दर्शन त्यांनी यावेळी घडविले.


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली १ आरपीएफ कंपनीचे एक अधिकारी, ३२ अंमलदार यांच्च्यासह पोलीस ठाणे कडील २ पोनि, ६ सपोनि/पोउपनि व ४२ अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परीसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणे म्हणजेच पनवेल मनपा येथून सुरू मुसलमान मोहल्ला, मिरची गल्ली नाका, टपाल नाका, उरण नाका, मच्छी मार्केट, वडघर, करंजाडे से. १, २, ३, ४ आणि सेक्टर ५ करंजाडे चौकी येथे समाप्त करण्यात आली. या रुट मार्चमध्ये ६ वाहनांसह पायी भेटी देवून त्यांना परीसर व परीस्थितीची माहिती देण्यात आली.



Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा