Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीई-रिक्षामुळे घोडे व्यावसायिकांवर गदा

ई-रिक्षामुळे घोडे व्यावसायिकांवर गदा

माथेरान : हातरिक्षा व घोडे हे वाहतुकीचे मुख्य पर्याय माथेरानमध्ये उपस्थित आहेत. ज्यावर येथील स्थानिकांचे अर्थचक्र चालते. माथेरानमधील सर्वात मोठा व्यवसाय घोडे व्यवसाय म्हटले तर वावगे ठरणार नाही. ४६० घोडे येथे पर्यटकांच्या दिमतीस आहेत व जवळजवळ ३०० कुटुंबे हा व्यवसाय करीत आहे. रिक्षांमुळे यांच्या व्यवसायावरती तर गदा येणार नाही ना अशी भीती नेहमीच घोडे व्यावसायिकांना वाटत असते. अनेक पर्यटक येथे फक्त घोडेस्वारीसाठी येत असतात. ई-रिक्षांमुळे त्यांच्या संख्येत घट तर होणार नाही ना अशी शंका येथील घोडेव्यवसायिक नेहमीच बोलून दाखवत असतात तर रिक्षांसाठी बनविण्यात येणाऱ्या क्ले पेव्हर ब्लॉक ला घोडे व्यवसायिकांचा विरोध आहे.

माथेरानमधले ९४ हातरिक्षा परवाने वितरित केले गेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र किती रिक्षा रस्त्यावर चालतात हा संशोधनाचा विषय आहे सध्या माथेरानमध्ये हात रिक्षा चालवण्याकरता खानदेशातील मजूर आलेले आहेत व तेच हा व्यवसाय करीत आहे व माथेरानमधील काही जुने ठराविक हातरिक्षा चालक या व्यवसायात अजूनही टिकून आहेत. ज्यांना खरोखर ई रिक्षाची गरज आहे. परंतु काही रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा ह्या खानदेशी मजुरांना भाडेतत्त्वावर चालवण्याकरता दिल्या आहेत.

ई रिक्षा सुरू झाल्यानंतर या रिक्षांचे भाव गगनाला भिडले असून पंधरा हजार रुपये मध्ये विकली जाणारी रिक्षा आता सात ते आठ लाखांमध्ये विकली जात आहे. सध्या ३५ रुपये इतक्या माफक दरामध्ये चालणारी ही रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. परंतु कायमस्वरूपी सुरू झाल्यानंतर त्यामध्ये बदल होणार का. नाहीतर ज्याप्रमाणे घोड्यांचे भाव दस्तुरी येथून माथेरान साठी आकारले जातात तसे रिक्षाचे होऊ नये याची खबरदारी आतापासूनच रिक्षा चालकांना घ्यायला हवी तरच त्याचा फायदा येथील पर्यटन वाढीस होणार आहे.असेही बोलले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -