Tuesday, July 9, 2024
HomeदेशLPG Cylinder: लोकसभा निवडणुकीआधी सामान्य नागरिकांना खुशखबर, कमी झाले एलपीजी सिलेंडरचे दर

LPG Cylinder: लोकसभा निवडणुकीआधी सामान्य नागरिकांना खुशखबर, कमी झाले एलपीजी सिलेंडरचे दर

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्याआधीच सामान्य नागरिकांना आज मोठी खुशखबर मिळाली आहे. सरकारी तेल आणि गॅस विपणन कंपन्यांनी आज १ एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपातीची घोषणा केली आहे. यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे.

कमर्शियल सिलेंडरवर कपात लागू

सरकारे तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात ३०.५० रूपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. दरम्यान, या कपातीचा लाभ केवळ १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर मिळेल. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

विविध शहरात आजपासून हे दर

ताज्या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरचे दर कमी होऊन १,७६४.५० रूपये झालेत. याचपद्धतीने कोलकातामध्ये आजपासून कमर्शियल सिलेंडरचे दर १,८७९ रूपये असतील. मुंबईत हे दर १,७१७.५० रूपये झाले आहेत. तर चेन्नईत या सिलेंडरच्या दरात १९३० रूपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

निवडणुकीआधी केली कपात

कमर्शियल सिलेंडरच्या दरातील ही कपात महत्त्वाची आहे कारण थोड्याच दिवसात मतदानाला सुरूवात होत आहे. सात टप्प्यात होणारी ही लोकसभा निवडणूक या महिन्यात सुरू होऊन जूनपर्यंत चालणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -