Sunday, September 14, 2025

प्रवाशांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत

प्रवाशांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत

रोहा : कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सप्टेंबरपर्यंत धावणार असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव जंक्शन नागपूर या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. दुसरी कडे मान्सूनमध्येहि गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी ही सेवा ३१ मार्चपर्यंत होती. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने या सेवेचा ९ जूनपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला. सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर-मडगाव जंक्शन ही गाडी ३ एप्रिल ते ८ जून या दरम्यान आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे. तर मडगाव जंक्शन नागपूर ही विशेष गाडी ४ एप्रिल ते ९ जून या कालावधीत पावसाचे दिवस वगळता प्रत्येक गुरूवारी आणि रविवारी असे आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. जून महिन्यात नागपूर-मडगाव साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

या गाड्या १२ जून ते ३० जून दरम्यान धावणार आहेत. नागपूर -मडगाव जंक्शनही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी नागपूर येथून बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३:०५ मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन-नागपूर ही द्वि-साप्ताहिक गाडी १३ ते ३० जून या कालावधीत गुरूवारी, रविवारी सायं. ७ वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९:३० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी वर्धा जंक्शन, पुलगाव, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, करमाळीसह अन्य स्थानकांवर थांबेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा