Thursday, July 10, 2025

IPL 2024: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

IPL 2024: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमने सामने आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली. मुंबई इंडियन्सचे टॉप ३ फलंदाज कोणत्याही धावा न करता पॅव्हेलियनमध्ये परतले. रोहित शर्माशिवाय नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस यांनाही या सामन्यात आपले खाते खोलता आले नाही. तर रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली.



रोहितच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड


रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सच्या या माजी कर्णधाराच्या नावावर हा लाजिरवाणा रेकॉर्ड नोंद झाला आहे. आतापर्यंत रोहित शर्माव्यतिरिक्त दिनेश कार्तिक आयपीएल इतिहासात १७वेळा शून्यावर बाद झाला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा नंबर लागतो. आतापर्यंत ग्लेन मॅक्सवेल १५ वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.



या यादीतील फलंदाजांची नावे


यानंतर पियुष चावला चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमध्ये पियुष चावला १५वेळा एकही धाव न करता बाद झाला आहे. सोबतच मनदीप सिंह आणि सुनील नरेनही १५-१५वेळा बाद झाले आहेत. रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशिवाय डेक्कन चार्जेसचाही भाग होता. दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशिवाय मुबई इंडियन्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात लायन्ससाठी खेळला आहे.

Comments
Add Comment