मुंबई : एकेकाळी तोट्यातील अर्थव्यवस्था आज नफ्यात आहे. बँकीग व्यवस्थेतील स्थित्यांतर हा अभ्यासाचा विषय आहे. २०१४ आधी बँकीग व्यवस्था डगमगली होती. गेल्या १० वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. गेल्या १० वर्षात झाले, ते फक्त ट्रेलर आहे. येत्या काळात आणखी बदल घडवायचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेना संबोधित करताना म्हटले की, रिझर्व्ह बँकेच्या स्थापना दिनानिमित्त मी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. देशाला नवी दिशा दाखविण्याचे काम आरबीआयने केले आहे. देशाच्या विकासात आरबीआय महत्त्वाची आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, यूपीआयला चालना मिळाली. भारताची बँक व्यवस्था जगातील आघाडीची बँकीग व्यवस्था मानली जात आहे. आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाच्या विकासासाठी भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आज तुम्ही जे धोरण बनवाल, काम कराल. त्याअनुषंगाने आरबीआयच्या पुढील दशकातील दिशा ठरणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आज भारताची बॅंकिंग सिस्टिमला स्ट्राँग आणि सस्टेनेबल सिस्टिम मानली जाते. जी बॅंकिंग सिस्टिम डुबणार होती, ती आता नफ्यात आली आहे आणि विक्रम करतेय. मागील १० वर्षात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. आमच्या नीतीमध्ये स्पष्टता होती. आज देश पाहतोय, नियत सरळ असते, तेव्हा नीती सरळ असते, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पब्लिक सेक्टर सुधारण्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. २७ हजारपेक्षा जास्त अप्लिकेशन ज्यात डिफॉल्ट होत्या. बँकांचा ग्रॉस एनपीए २०१८ मध्ये सव्वा अकरा टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तो आता २०२३ पर्यंत आता तीन टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बॅंकिंग क्रेडिट ग्रोथ १५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आरबीआयची यात मोठी भूमिका आहे आणि ते अभिनंदनास पात्र आहेत.
भारताची प्रगती वेगाने व्हावी आणि इक्लुझिव्ह व्हावी यासाठी आरबीआयला पाऊले उचलावे लागतील. आरबीआय विविध क्षेत्राला लागणाऱ्या गरजांसंदर्भात भूमिका आरबीआयनं घ्यावी, बँकांना मदत करावी, सरकार आरबीआयसोबत आहे. महागाई कमी व्हावी, यासंदर्भात आधी धोरण व्यवस्थित नव्हते, मात्र पतधोरण समितीने त्यावर काम केले. कोरोना आणि युद्धात देखील महागाई दर आटोक्यात आपण ठेवला. ज्यांचे व्हिजन व्यवस्थित आहे, त्यांची प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जगातील मोठे-मोठे देश कोरोनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत, त्याच भारतीय अर्थव्यवस्था नवे किर्तीमान स्थापित करत आहे. आरबीआय भारताचा वैश्वि कस्तरावर घेऊन जाऊ शकते, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.