यात तुमची रास तर नाही ना?
मुंबई : प्रत्येक दिवसाची सुरवात नव्या स्वरुपात होत असते. तुमच्या मनासारखा दिवस जाण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार की नाही, हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे, तर साप्ताहिक राशिभविष्य आठवड्याचा अंदाज असतो. यासाठी ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून आजचा दिवस किंवा आठवडा कसा आहे हे राशिभविष्याच्या माध्यमातून सांगितलं जातं. त्यातच या महिन्यात एका राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसू शकतो असे ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून भविष्य वर्तवण्यात आले आहे. ती रास कोणती हे जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मकर (Capricorn) राशीतील लोकांच्या खिशाला फटका बसणार आहे असं सांगितलं गेलं आहे. आठवडा सुरू होताच मकर राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मागील गुंतवणुकीतील परतावा अपेक्षेप्रमाणे चांगला नसेल. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करा कारण कोणताही विचार न करता गुंतवणूक केल्यास पैसे गमावण्याची शक्यता आहे जे लोक कायदेशीर अडचणीत आहेत त्यांना तोडगा काढण्यासाठी योग्य मार्ग सापडतील.
मकर राशीचे लोकांच्या या आठवड्यात आरोग्याशी संबंधित काही समस्यांपासून दूर राहतील. जर तुम्ही ॲसिडिटी,अपचन आणि संधिवात यांसारख्या आजारांनी त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला या आजारांपासून थोडा आराम मिळेल. तसेच सर्दी, खोकला इत्यादी किरकोळ समस्यांपासून दूर राहाल.