मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक घाईघाईने काम करतात. जे लोक सकाळी ऑफिसला जातात त्यांच्यासाठी तर सकाळची वेळ खूपच धावपळीची असते. अनेकदा सकाळी लोक नाश्ताही करू शकत नाहीत. याशिवाय टिफीन घेऊनही ते घाईघाईत घराबाहेर पडतात.
अशातच काही गोष्टींबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा लोक घाईघाईने घराबाहेर पडतात तेव्हा गरम खाणे टिफीनमध्ये भरतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का प्लास्टिकच्या डब्यात गरम खाणे पॅक केल्याने आरोग्यावर किती मोठे नुकसान होते ते.
प्लास्टिकमध्ये गरम जेवण पॅक करण्याचे तोटे
प्लास्टिकच्या डब्ब्यात गरम जेवण पॅक केल्याने शरीरास मोठे नुकसान होते. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा प्लास्टिकमधील रासायनिक घटक जेवणासोबत मिसळतात आणि ते शरीरात जाऊन अनेक आजार निर्माण करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. याशिवाय प्लास्टिकमधील काही केमिकल्स मुलांच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करतात.
या आजारांचा असतो धोका
प्लास्टिकमधील काही केमिकल्समुळे हार्मोनचे संतुलन बिघडू शकते. यामुळे डायबिटीजसारखा आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्ही दररोज असे करता तर थायरॉईडचा धोका अधिक वाढतो. प्लास्टिकमधील काही केमिकल्समुळे स्किन अॅलर्जीही होऊ शकते. अनेकदा गरमागरम जेवण पॅक केल्याने प्लास्टिक वितळण्याची शक्यता असते. यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काच अथवा स्टीलच्या डब्याचा वापर करू शकता.