नवी दिल्ली: देशातील वाहनचालकांसाठी मोठी बातमी आली आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने सांगितले की सध्या देशात टोलच्या दरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मंत्रालयाने यासाठी निवडणूक आयोगाचा हवाला देत सांगितले की निवडणुकीपर्यंत टोलचे जुनेच दर लागू असतील.
याआधी बातमी आली होती की देशात १ एप्रिलपासून अनेक ठिकाणी टोलचे नवे दर लागू होतील. लखनऊ आणि आजूबाजूला तर टोल दरात ५ टक्के वाढीची घोषणाही झाली होती.
भारताच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला सांगितले होते की त्यांनी हायवेवरील नवे टोल दर हो लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत. साधारणपणे देशातील अधिकतर टोलच्या दरात १ एप्रिलला वाढ केली जाते मात्र निवडणूक आयोगाने सांगितले की नवे दर लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत.
निवडणूक आयोगाने नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला दिल्या गेलेल्या आदेशात म्हटले की सध्यातरी दरवाढीचा हा निर्णय टाळण्यात यावा. देशभरातील हायवे आणि एक्सप्रेवेवर तब्बल ५ टक्के टोलशुल्क एक एप्रिलपासून वाढणार होते.
देशात १८व्या लोकसभेसाठी १९ एप्रिलपासून मतदान सुरू होत आहे. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जूनला मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जूनला होणार आहे. नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये यावेळेस ८५५ टोल प्लाझा आहेत.