Wednesday, July 9, 2025

उन्हाळी भातशेती बहरल्याने शेतकरी समाधानी

उन्हाळी भातशेती बहरल्याने शेतकरी समाधानी

रोहा : कालव्याच्या पाण्यावर आधारित केली जाणारी उन्हाळी हंगामातील भातशेती चांगलीच बहरल्याने शेतकरीवर्ग समाधानी दिसत आहे. रोहा तालुक्यातील डोलवहाळ बंधा-यातून कालव्याच्या सहाय्याने काही भागात उन्हाळी हंगामातील भातशेती पिकविली जाते. उन्हाळी हंगामातील भातशेतीचे पीक हे शेतकरीवर्गाच्या हातात असल्याने ते त्यांना चांगले परवडते. तर कालव्यातून शेतीला आवश्यक पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याचेही योग्य प्रकारे नियोजन करून आपल्याला आवश्यक असणारी पिके पिकविली जातात.


साधारणपणे डिसेंबर महिन्यात कालव्याचे पाणी उपलब्ध झाले तर साधारणपणे भातपिके तयार होतात. कधी पुरेसा हंगाम मिळत नसल्याने भातशेतीचे नुकसान होते. परंतू या वर्षी पाटबंधारे विभागाकडून किमान वेळेत पाण्याचे नियोजन झाल्याने भातशेती बहरली. तर ढगाळ वातावरणामुळे पावसाची टांगती तलवारही डोक्यावर असल्याने त्याचा धसकाही शेतकरी वर्गाने घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा