'फसलेला रविवार' कविता आणि काव्यकोडी

फसलेला रविवार


ठरवले मी या रविवारी, आरामात उठणार
घड्याळाच्या काट्यावर, मुळीच नाही पळणार
बिछान्यात शिरून,
मनसोक्त लोळणार
मैदानावरसुद्धा मी,
हवे तेवढे खेळणार
बागेतल्या गुलाबांशी,
गप्पाही मारणार
तबला, पेटी, गाण्यात,
मस्त रंग भरणार
रविवारचे हे सारे बेत,
मीच केले पास
रविवार माझा असेल,
एकदम झकास!
पण रविवार उजाडला, मोठ्या नाखुशीने
पाहुणे झाले हजर, सकाळच्याच गाडीने
घाई, गडबड आवाजाने,
घर गेलं भरून
झोप माझी पळाली,
बसलो डोकं धरून
पाहुण्यांची सरबराई, करण्यात दिवस गेला
बेत माझे सारेच, अहो, पडले बाजूला
पाहुण्यांचं बोलणं ऐकून,
मी तर चक्रावलो
म्हणे, “आज रविवार,
म्हणूनच मुद्दाम आलो.”

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) अभिनयाची आवड
भूमिकेचा अभ्यास
भाषा, शब्दोच्चार
हवेत बरं खास

वेशभूषा, रंगभूषा
संवाद तोंडपाठ
रंगमंचावर सांगा
घालतात कशाचा घाट?

२) वर्णनात्मक, अनुभवकथन
कधी आत्मकथन
कल्पनाप्रधान, वैचारिक
या प्रकारांत करती लेखन

दिलेल्या विषयावर
करतो सुसंगत मांडणी
शाळेत आपण हे लिहितो
आठवलं तर सांगा कोणी?

३) दिनांक, स्थळ, वेळेचा
उल्लेख असतो अचूक
संबंधित व्यक्तीच्या नावात
होत नाही बरं चूक

शीर्षक, उपशीर्षक
असतो याचा गाभा
वर्तमानपत्राच्या रकाण्यात
कोण घेतं जागा?

 उत्तरे :


१) नाटक

२) निबंधलेखन

३) बातमी

 
Comments
Add Comment

ढग कसे चमकतात?

कथा ,प्रा. देवबा पाटील नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपला शाळेचा गृहपाठ व अभ्यास आटोपल्यावर सीता व नीता मावशीजवळ

इच्छेला प्रयत्नांची जोड हवीच

शिल्पा अष्टमकर: गोष्ट लहान, अर्थ महान माणसाच्या जीवनात इच्छा असणे ही पहिली पायरी आहे, पण केवळ इच्छा असून चालत

संस्कारक्षम मन

प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ शाळेचे अनेक उपक्रम असतात. अशाच एका उपक्रमात शाळेतल्या विद्यार्थ्यांना

चिंगी मुंगी...

कथा: रमेश तांबे एक होती मुंगी नाव तिचं चिंगी एकदा काय झालं चिंगी खूपच दमली पळून पळून खरेच थकली मग तिने

सायंकाळी आकाश रंगीबेरंगी कसे दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील  रोजच्याप्रमाणे सीता व नीता सायंकाळी या शाळेतून घरी आल्या. आपला गृहपाठ आटोपून मावशीला

विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय

दि विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. भाऊ राणे, लक्ष्मण आर. प्रभू, विश्वनाथ