Friday, July 19, 2024
Homeक्राईमधक्कादायक! बर्थडे झाला पण मुलीचा जीव गेला

धक्कादायक! बर्थडे झाला पण मुलीचा जीव गेला

ऑनलाइन मागवलेला केक खाऊन १०वर्षीय मुलीचा मृत्यु

पटियाला : परिवाराला त्यांच्या १० वर्षीय लेकीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा होता. वाढदिवसानिमित्ताने त्यांनी ऑनलाइन केक मागवला होता. मात्र केक खाताच वाढदिवस असणाऱ्या मुलीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पंजाबमधल्या पटियाला या ठिकाणी ही घटना घडली आहे. वाढदिवसानिमित्त ऑनलाइन मागवलेला केक खाताच १० वर्षाची मुलगी मानवी आणि तिच्या घरातल्या लोकांना उलट्या, मळमळ असा त्रास होऊ लागला. अशातच ज्या मुलीचा वाढदिवस होता त्या दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

या मुलीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. केक खाण्याआधी ही मुलगी अगदी व्यवस्थित, छान धमाल मस्ती करताना दिसत आहे. पण केक खाल्ल्यानंतर या मुलीची प्रकृती बिघडली. काही तासांनी तिचं शरीर थंड पडलं. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचारही केले मात्र काही वेळाने तिला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या मुलीचं नाव मानवी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच केक कुठून आणला होता त्याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

मुलीच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणी कारवाई केली पाहिजे असं या मुलीच्या आजोबांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणानंतर ऑनलाईन जेवण, खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सनी जेवण व्यवस्थित आहे ना, हे तपासून ग्राहकाला दिलं पाहिजे. असे मुलीच्या आजोबांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -