Vanchit Bahujan Aghadi : संजय राऊतांची सारवासारव निरर्थक! एकट्याने लढण्याची वंचितची घोषणा

  116

'त्यांचे भांडण मिटत नसताना ते वंचितला दोष देत होते' प्रकाश आंबेडकरांचा मविआवर आरोप


मुंबई : महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) तीन घटक पक्षांचे आपापसांतच अनेक मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना मविआने सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यातील भांडणंच मिटत नसल्यामुळे प्रकाश आंबेडकर त्या वाट्याला जास्त काळ गेले नाहीत. त्यांना पुन्हा सोबत घेण्याविषयी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने भाष्य करत होते. मैत्रीपूर्ण चर्चा होत असल्याचे भासवत होते. मात्र, आता प्रकाश आंबेडकरांनी जाहीरपणे एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा करत मविआवर आरोप केले आहेत. त्यामुळे सारवासारव करणारी मविआ चांगलीच तोंडावर आपटली आहे.


प्रकाश आंबेडकरांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता आम्ही महाराष्ट्रात आमचे उमेदवार उभे करणार आहोत, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. आंबेडकरांच्या या घोषणेमुळे आता महाविकास आघाडीची मोठी अडचण होऊ शकते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांत आपापसात एकमत झालं नाही. आम्ही हेच सांगत होतो. आता मात्र ते स्पष्ट झालं आहे. तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत. महाविकास आघडीत ज्या मतदारसंघात मतभेद होते, ते मतभेद अजूनही कायम आहेत. याच कारणामुळे मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा चालू आहे. म्हणूनच अगोदर तुमचे भांडण मिटवा असं आम्ही त्यांना सांगत होतो. मुळात त्यांचे भांडण मिटत नसताना ते वंचितला दोष देत होते. त्यांच्यातील भांडण न मिटल्यामुळे आम्ही त्यांच्यात पडत नव्हतो. आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यापैकी कोल्हापूर आणि नागपूर या दोन जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. आणखी पाच जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करू.


आम्ही जाहीर करतो की महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. इलेक्ट्रोल बाँड हा विषय निवडणुकीत महत्त्वाचा राहील. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय मुद्द्यांसह इतर मुद्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच त्यांच्यामधली भांडणं मिटलेली नाहीत. आता निवडणूक जवळ आली आहे. आम्ही या निवडणुकीची तयारी केली होती. त्याच तयारीच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. आम्ही महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत आमचे उमेदवार देणार आहोत, अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.



...म्हणून ते आम्हाला दोन-तीन जागा देऊ असे सांगत होते


आज एकाच विचाराची माणसं, पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. १४ ते १५ मतदारसंघांत अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी कॅटॅलिस्ट म्हणून भूमिका बजावू शकते, असे आम्ही त्यांना सांगत होतो. पण दुर्दैवाने दोन गोष्टींची अडचण आहे, असं आम्ही मानतो. प्रस्थापित आणि विस्तापित यांचा समन्वय करून आपण ही निवडणूक लढवूया, असं आम्ही सांगत होतो. मात्र याला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा नकार होता. त्यामुळेच ते आम्हाला दोन आणि तीन जागा देऊ असे सांगत होते, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.



...म्हणून मला पाचच मिनिटे देण्यात आली


त्यांना आमची दुसरी एक अडचण होती. ती अडचण मला राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेत दिसून आली. निवडणुकीत विरोधी पक्षाला अंगावर घ्यावं लागतं. टीकेला शस्त्र करावं लागतं. त्या सभेत मी अनेक गोष्टी मांडू शकतो आणि त्यांची अडचण होऊ शकतो त्यामुळे मला पाचच मिनिटे देण्यात आली.



काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे आमचा ८ जागांवर पराभव


२०१९ सालच्या निवडणुकीत आम्ही आठ जागांवर काँग्रेस आणि एनसीपीमुळे पराभूत झालो. आमच्यामुळे त्यांना अनुसूचित जातीची मत मिळाली. मात्र काँग्रेस आणि एनसीपीने आम्हाला मिळणारी मुस्लीम समाजाची मतं घेली. आम्हाला मुस्लीम मतं मिळाली असती तर आम्ही जिंकलो असतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी