लंडन : देशात आढळणाऱ्या एकूण कचऱ्यामध्ये सर्वाधिक कचरा हा प्लॅस्टिकचा आहे. या प्लॅस्टिकचा कचऱ्यामुळे देशावरील संकट वाढवले आहे. अनेक ठिकाणी प्लॅस्टिकविरोधी कारवाई आणि जनजागृती केली जाते. अशातच लंडनमधील संशोधकांनी प्रदूषण कमी करण्यास हातभार लागेल असा नवा शोध लावला आहे. अर्थात अशा नवनवीन संशोधनांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक होते. काही शोध मानवी इतिहास बदलण्यास समर्थ असतात तर काही शोध दिशा बदलणारे असतात.
संशोधकांनी पाणी प्यायल्यानंतर ते ज्यात भरले आहे ती बाटली अथवा फुगा खाताही येणार असा नवा शोध लावला आहे. पाणी पिवून झाल्यावर ते खायचा नसल्यास फेकायचा असेल तरीही काही अडचण नाही. तो सहज डिग्रेड होऊ शकणार आहे आणि त्याच्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही, असे संशोधकांनी सांगितले.
‘ओहो’ नावाची ही फुगेवजा बाटली रॉयल कॉलेज ऑफ आर्टस आणि इंपेरियल कॉलेज लंडन यांच्या संशोधकांनी तयार केली असून त्याचे प्रमुख आहेत रोडिग्रो गार्सिया गोंगालेज. जिलेटिन पासून ही बाटली बनविली गेली आहे. केवळ पाणीच नाही तर कोणताही द्रव पदार्थ त्यात भरता येणार आहेत असा संशोधकांचा दावा आहे.
विशेष म्हणजे या बॉटल्सचा शोध दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये लावण्यात आला होता. भारतातही सध्या या बॉटल्स उपलब्ध असून अॅमेझॉनसारख्या वेबसाईट्सवरुन तुम्ही त्या ऑनलाईन मागवू शकता.