Share

सही

‘सही’ ज्याला येत नाही
जगी त्याचे महत्त्व काय?
‘सही’मध्ये लपून बसतात
अनेक हात अनेक पाय

‘सही’मध्ये लपतात काही
बोकोबाच्या लांब मिशा
‘सही’ म्हणजे रेघोट्यांनी
काढलेल्या ऊठबशा

‘सही’मध्ये लपून बसतो
वेटोळ्याचा मोठ्ठा साप
‘सही’ म्हणजे अक्षरांची
वेडीवाकडी सुंदर छाप

‘सही’ म्हणजे म्हातारीचे
पिंजारलेले पांढरे केस
‘सही’ म्हणजे नकाशाच
चित्तारलेला नवा देश

‘सही’ म्हणजे नाक डोळे
‘सही’ म्हणजे कान शेपूट
पहिले सोडून शेवटच्यांना
‘सही’त असते अक्षर सूट

‘सही’ वाटते म्हाताऱ्याच्या
डोईवरला गोल फेटा
‘सही’ म्हणजे मोळी बांधेल
अक्षरांचा लाकूडफाटा

‘सही’ म्हणजे सापशिडी
‘सही’ असते वावटळ गोल
‘सही’मध्ये दडून असतो
अर्थ गहिरा खूप खोल

‘सही’त खरंच दिसून येते
चित्रकला बाळाची
‘सही’ असते ओळख आपल्या
वर्तमान काळाची

– भानुदास धोत्रे, परभणी

माझे घर

बांधाबांधावर
कोकिळ गान
कोकणच्या भूमीला
ईश्वरीय दान…

उगवतीच्या सूर्याला
वासुदेवाची हाक
नित्यनेमे देवाची
करुणा भाक…

वाड्याला खेटून
ऐसपैस लांब
वाशात दडले
पोलादी खांब…

सोनियाचे द्वार
मागे परसदार
माजघर देवघर
खोल्या भारंभार..

कौलारू घरांना
लाल रंग काम
सोनमुख मातीला
दुप्पटीने दाम…

जाईभोवती जुई
फुलून येई
मोगऱ्याच्या ताटव्याला
फुलण्याची घाई…

रांगोळी शेजारी
पणत्यांना आस
घरकुलात होतो
विठ्ठलाचा भास…

– पूजा काळे

 

Recent Posts

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

10 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

15 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

45 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

1 hour ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

1 hour ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

2 hours ago