पंजाबमध्ये सनी देओलचा पत्ता कट; कोणाला मिळाले तिकीट?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरु असून भाजपाने नववी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बहुचर्चित राजस्थानच्या भीलवाडा लोकसभा मतदारसंघातून दामोदर अग्रवाल यांना तिकीट देण्यात आलं आहे. आतापर्यंत ४१२ उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यापूर्वी भाजपाने काल आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली होती. त्यामध्ये पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे तिकिट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी हंसराज हंस यांना तिकिट देण्यात आले.
५४३ सदस्यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत ४१२ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने पहिल्या यादीत १९५, दुस-या यादीत ७२, तिस-या यादीत ९, चौथ्या यादीत तामिळनाडूतील १४ आणि पुद्दुचेरीतील १ उमेदवारांची घोषणा केली होती. तर पाचवी यादी २४ मार्चला जाहीर करून १११ उमेदवारांची घोषणा केली होती. यात भाजपाने पीलीभीतमधून वरुण गांधी यांचे तिकिट रद्द केले होते.
भाजपाने २६ मार्चला सहावी यादी जाहीर करून तीन, सातव्या यादीत दोन आणि आठवी यादी ३० मार्च रोजी जाहीर केली होती. यात त्यांनी अभिनेता सनी देओल याचे तिकिट कापले होते. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
Lok Sabha Elections 2024: BJP announces candidature of Damodar Agarwal from Rajasthan’s Bhilwara constituency pic.twitter.com/dekYEGdnRr
— ANI (@ANI) March 31, 2024