
मुंबई: उन्हाळा येताच लोक थंड पदार्थ खाण्यास सुरूवात करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत कोल्ड्रिंक, फ्रूट ज्यूस, लस्सी, शिकंजी, श्रीखंड तसेच आईस्क्रीम हे खाण्याला मोठी पसंती असते. अधिकतर लोक तर आईस्क्रीम खाणे पसंत करतात.
मात्र तुम्हाला माहीत आहे की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींचे सेवन चुकूनही करू नये. जाणून घ्या आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीम खाणे अधिक पसंत करतात. मात्र हे खाल्ल्यानंतर लगेचच काही गोष्टींचे सेवन करू नये.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नये. असे केल्याने पोटदुखी, गॅस, अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.
याशिवाय तुम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर गरम पदार्थांचे सेवन करू नये. जसे चहा, कॉफी, सूप, ग्रीन टी इत्यादी. इतकंच नव्हे तर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच संत्री, लिंबूपाणी, द्राक्षे या फळांचे सेवन करू नये. हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चुकूनही दारूचे सेवन करू नये. यामुळे उल्टीचा त्रास, पोटातील त्रास तसेच चक्कर येणे या समस्या सतावू शकतात. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर भोजनही करू नये जसे मटन, बटर, तुपात बनवलेले पदार्थ, बिर्याणी, चायनीज पदार्थ, जंक फूड खाऊ नयेत.
याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजेपेक्षा अधिक आईस्क्रीमचे सेवन करू नये. कारण यामुळे शरीरास नुकसान होते. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कमीत कमी ४० मिनिटांपर्यंत काही खाऊ नये.