कल्याणमधील घनकचरा प्रकल्पाला प्रचंड आग; सर्वत्र धुराचे लोट

कल्याण : कल्याण पश्चिम बारावे येथील घनकचरा प्रकल्पाला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या ठिकाणी कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा पद्धतीने विलगीकरण केले जाते. मात्र कडक उन्हाच्या झळांमुळे हा कचरा वाळून गेला आहे. या वाळलेल्या कचऱ्याला आज सकाळी भीषण आग लागली असता सर्व कचरा आगीमध्ये जळून खाक झाला. वाऱ्याचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते तर सर्वत्र धुराचे लोटदेखील पसरले होते.


कचरा केंद्र परिसरात कर्मचारी नसल्याने जीवित हानी झाली नाही. आगीच्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या. बारावी परिसरातील अनेक उंच गृह संकुलांमध्ये धूर पसरल्याने रहिवासी अस्वस्थ होते. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली पालिका अग्निशन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी अग्निशन दल पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.


या कचरा केंद्रावर कल्याण परिसरातील कचरा पालिकेकडून जमा केला जातो. गेल्यावर्षी या कचरा केंद्राला भीषण आग लागली होती. कचऱ्यामधील विविध प्रकारचे घटक उन्हामुळे तप्त होतात. त्यामधून मिथेन वायू तयार होऊन अशा आगी लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वेळा अज्ञात इसमांकडून कचऱ्यावर पेटती काडी टाकली जाते. त्यामुळेही आगीच्या घटना घडल्या आहेत असं यापूर्वीही सांगण्यात आलं आहे.


Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या