
भारताची एकता, एकात्मता कमकूवत करणे ही काँग्रेसची नीती; पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर खोचक टोला
ट्विट करत काय म्हणाले पंतप्रधान?
नवी दिल्ली : १९७० च्या दशकात काँग्रेसकडून कच्चाथीवू (Katchatheevu) बेट श्रीलंकेला देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कच्चाथीवू हे बेट ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले आहे. याठिकाणी एक चर्च आहे. शिवाय, श्रीलंकेचे मच्छिमार याठिकाणी थांबत असतात. याठिकाणी गेलेल्या भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्यात येते. १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिल्याचं सांगण्यात येतं. यावेळी विरोधकांनी विरोध दर्शवला होता. पण, दोन्ही देशातील संबंधांच्या दृष्टीकोनातून हे बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. परंतु आता ही घटना पुन्हा उभी राहत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक्सवर ट्विट करुन काँग्रेसवर टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, डोळे उघडणारे आणि धक्कादायक नवी तथ्ये समोर आली आहेत. यानुसार काँग्रेसने भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देऊन टाकले आहे. यामुळे भारतीय लोकांमध्ये संताप आहे. आपण काँग्रेसवर विश्वास ठेवू शकत नाही, या गोष्टीवर लोक निश्चित झाली आहेत. भारताची एकता कमकूवत करणे, एकात्मता आणि देशाच्या हिताला प्राधान्य न देणे अशी काँग्रेसची नीती राहिली आहे. गेल्या ७५ वर्षांपासून काँग्रेस हेच करत आली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भारताच्या किनाऱ्यापासून २० किलोमीटर दूर पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये १.९ स्क्वेर किलोमीटर क्षेत्रफळाचे एक बेट आहे. हे बेट स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होता. पण, यावर श्रीलंकेकडून दावा करण्यात आला. शिवाय श्रीलंकेच्या हवाई दलाने या बेटावर युद्धसराव देखील केला. पाल्क सामुद्रधुनीमध्ये मच्छिमारी करणाऱ्या लोकांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे अशी माहिती तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के अन्नमलाई यांनी मिळवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Eye opening and startling! New facts reveal how Congress callously gave away #Katchatheevu. This has angered every Indian and reaffirmed in people’s minds- we can’t ever trust Congress! Weakening India’s unity, integrity and interests has been Congress’ way of working for…
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2024