किमयागार...

हलकं-फुलकं - राजश्री वटे


जरा हात दे बरं
उठून बसावं जरा
झोपून कंटाळा आला...


हाताचा आधार घेऊन बाल्कनीत येऊन उभं राहिलं की, बरं वाटतं रस्त्यावरची वर्दळ बघायला! तेवढ्यात त्या गर्दीतून एक ओळखीचा हात हलला, बाल्कनीतूनही हात हलवला. या दोन हातांची एकमेकांना साद घालणं ही एक दुसऱ्याला साथ देण्याची समर्पक खूण असते. माणसांच्या गर्दीतही हात देणारा कोणीतरी आहे, हा पण एक मानसिक आधार असतो. मनाच्या हाताचा आधार घेत भूतकाळात वळून पहावं... लहान बाळाला याच हातांनी न्हाऊ-माखू घातलेलं असतं, भरवलेलंसुद्धा असतं, हाताचा पाळणा करून झोपवलेलंही असतं. लहान जीवाला या दोन हातांचा आधार असतो. हाताचं बोट धरून ठुमकत चालणारं बाळ कसं गोड दिसतं, आनंदाने टाळ्या वाजवतं, दोन हातांनी!


जसं आयुष्य पुढं सरकत जातं तसं हातांची कर्तव्य, क्रिया बदलत जातात. जरा आठवणींचा हात धरून दोन पावलं पुढे जाऊन पाहू. जीवाभावाची मैत्री व्हायचं ते वय एकमेकांच्या खांद्यावरचे हात घट्ट मैत्रीची साक्ष देतात! मेहनत करून यशाकडे वाटचाल सुरू होते. हातांना कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव व्हायला लागते. मोठ्यांपुढे नमस्कारासाठी जुळतात, आशीर्वादाचा हात सदैव डोक्यावर राहतो! कलेचं वरदानही या हातांना असतं. या हातांनी अचंबित करणाऱ्या सुंदर कलाकृती साकारल्या जातात. त्या सुंदर कलाकृती बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते.


सप्तपदीला दोन जीवांचा हातात हात असतो. एक मेंदीने रंगलेला, तर दुसरा कर्तव्याच्या जाणिवेचे भार सांभाळण्याच्या तयारीत असतो. या हातांनी नेहमी चांगले कर्म व्हावे यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवून वचन घेतले जाते.


जसं जसं प्रौढत्वाकडे पावले सरकतात तसे आधारासाठी हात लागतो. हाताला हात देणारे कायम पुढे असायचे, पण आज परिस्थिती कशी बदलत चालली आहे. आज सुखाच्या क्षणी टाळ्या वाजवून आनंद साजरा करतात, तर दु:खात अश्रूही पुसतात व एकमेकांना घट्ट धरून ठेवतात, स्वत:लाच स्वत:चा आधार देत! निशब्द असलेल्या हातांचा स्पर्शसुद्धा खूपदा पुरेसा असतो, न बोलताही खूप काही सांगून जातो. अडचणीत पुढे आलेला हात म्हणजे ओंजळभर आनंद. ते म्हणतात ना
‘देणाऱ्याने देत जावे’ या दोन हातांना मनापासून नमस्कार.

Comments
Add Comment

...म्हणून समाज मोदींना मानतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते देशाचे पंतप्रधान इतका मोठा आणि अविश्वसनीय प्रवास करणारे नरेंद्र मोदी

मराठी पत्रकारितेचे जनक - बाळशास्त्री जांभेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर आचार्य अत्रे यांनी कै. बाळशास्त्री जांभेकर यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ असे म्हटले

छडी वाजे छमछम

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू मुलं लहान असतानाच शिस्त लावण्याची सुरुवात करायला हवी. पण मुलं लहान असताना

“...हम भी देखेंगे!”

बरोबर १०३ वर्षांपूर्वींची इम्तियाज अली ताज यांची एक कादंबरी सिनेदिग्दर्शक के. आसिफ यांना इतकी आवडली की त्यांनी

घेता घेता...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता

कथा सोमकांत राजाची

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे सर्व देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणेशाच्या विविध वैशिष्ट्याचे