Friday, October 31, 2025
Happy Diwali

९,९९९ रूपयांना मिळत आहे Redmiचा जबरदस्त फोन, ८ जीबी रॅम

९,९९९ रूपयांना मिळत आहे Redmiचा जबरदस्त फोन, ८ जीबी रॅम

मुंबई: शाओमीच्या(Xiomi) स्मार्टफोनला लोकांची मोठी पसंती असते. कंपनी प्रत्येक युजर्ससाठी विविध रेंजचे स्मार्टफोन्स सादर करत असते. दरम्यान, कंपनी परवडणारे फोन बनवण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. अशातच तुम्ही विचार करा की जर तुमचा फेव्हरिट फोन अधिकच स्वस्तात मिळत असेल तर...

आम्ही बोलत आहोत रेडमी 13Cवर मिळणाऱ्या ऑफरबद्दल. वेबसाईटवर हा फोन १३९९९ रूपयांच्या ऐवजी १०,९९९ रूपयांना खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय इफेक्टिव्ह किंमतीप्रमाणे हा फोन ९,९९९ रूपयांना खरेदी करू शकतो.

स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 600nits पीक ब्राईटनेससोबत 6.74-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच 1600 × 720 पिक्सेल रेझोल्यूशनसोबत येतो. कॅमेऱ्यामद्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सेल चा मॅक्रो कॅमेरा आणि डेप्थ सेन्सॉर म्हणून तिसरा कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी या फोनमद्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो.

यात ८ जीबी LPDDR4X रॅम आणि ८ जीबी व्हर्च्युअल रॅम आणि 256जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसोबत MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

Comments
Add Comment