Friday, December 13, 2024
HomeदेशBharat Ratna 2024: उत्साहात पार पडला भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा

Bharat Ratna 2024: उत्साहात पार पडला भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा

चौधरी चरणसिंग, पीव्ही नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन, कर्पूरी ठाकूर यांचा मरणोत्तर सन्मान 

लालकृष्ण अडवाणी यांना घरी जाऊन करणार सन्मानित

नवी दिल्ली : दिल्ली येथे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Droupadi Murmu) यांच्या हस्ते दोन माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांच्यासह पाच प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna 2024) प्रदान करण्यात आले.

भारतरत्न देण्यात येणाऱ्या पाच व्यक्तिमत्त्वांमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh), पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao), प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांचा समावेश आहे. अडवाणी वगळता इतर चौघांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून सन्मान स्वीकारला. लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार होते, मात्र आज ते राष्ट्रपती भवनात हजर राहिले नसून ३१ मार्च रोजी राष्ट्रपती त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वीच पोस्ट केले होते की, आज हे सांगण्यास आनंद होत आहे की, आपले माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाची समृद्धी आणि विकास यांचा भक्कम पाया रचण्यात मोलाचा वाटा उचलला.

चौधरी चरणसिंग यांच्या सन्मानाची घोषणा करताना, “देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. असे पंतप्रधानांनी ट्विट केले होते.

पीएम मोदींनी कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणाही केली होती. ही घोषणा करताना त्यांनी म्हटले होते की, सरकार एमएस स्वामिनाथन जी यांना भारतरत्न प्रदान करत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे, त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात केलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करण्यात मोलाची भूमिका बजावली. आव्हानात्मक काळात शेतीवर अवलंबून राहणे आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -