Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीखिशाला लागणार कात्री! पुणे-सातारा आणि पुणे-नाशिक प्रवास महागणार

खिशाला लागणार कात्री! पुणे-सातारा आणि पुणे-नाशिक प्रवास महागणार

१एप्रिलपासून अशी असेल टोल दरवाढ

पुणे : पुणे-सातारा आणि पुणे-नाशिक प्रवास महागणार असून १ एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडून टोल दरवाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील प्रवास महागणार आहे. एक एप्रिलपासून या दोन महामार्गावर साधारण अडीच टक्क्यांनी टोलमध्ये वाढ होणार आहे.

पुणे-सातारा मार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी येथील टोल नाक्यांवर मोटार, जीप व हलक्या वाहनांना पूर्वी ११५ रुपये टोल आकारला जात होता. त्यामध्ये पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी १२० रुपये टोलसाठी मोजावे लागतील. खेड शिवापूर टोल नाक्यावर बस आणि ट्रकसाठी ३९० रुपये दर होता. नवीन निर्णयानुसार या वाहनांना आता चारशे रुपये मोजावे लागणार आहेत. अवजड वाहनांसाठी खेड शिवापूर टोल नाक्यावर ६१५ रुपये टोल आकारला जात होता. आता त्यात १५ रुपयांनी वाढ झाली असून, त्या वाहनांना ६३० रुपये टोल भरावा लागणार आहे.

पुणे-नाशिक मार्गावर चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यांवर मोटार, जीप व हलक्या वाहनांसाठी १०५ रुपये टोल होता. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एकेरी वाहतुकीसाठी आता ११० व दुहेरी वाहतुकीसाठी १६० रुपये वाहनचालकांना द्यावा लागणार आहेत. याशिवाय ट्रक व बसच्या एकेरी वाहतुकीसाठी ३७० रुपये द्यावे लागतील. स्थानिक खासगी वाहनांसाठी ३४० रुपयांचा मासिक पास देण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -