Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीLeopard in Hinjewadi : हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळलं नवजात बिबट्याचं पिल्लू

Leopard in Hinjewadi : हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळलं नवजात बिबट्याचं पिल्लू

बिबट्याचा वावर असल्याचं समजल्याने नागरिकांमध्ये घबराहट

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं अनेकदा विविध घटनांमधून समोर आलं आहे. त्यावर आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. कारण इथल्या परिसरात एका शेतात नवजात बिबट्याचं पिल्लू आढळून आलं. या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग आणि अॅनिमल रेस्क्यू टीमने ताब्यात घेतलं आहे. बिबट्याच्या वावरामुळे येथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सध्या हिंजवडी परिसरात ऊसतोडणी वेगात असल्याने बिबट्या व त्यांचे बछडे आढळण्याचे प्रकार घडत आहेत. आज नेरे (मुळशी) येथील ऊसाच्या फडात बिबट्याच्या नर जातीचा एक नवजात बछडा आढळून आला. हिंजवडी आयटीलगत अगदी पाच किमी अंतरावरील नेरे येथील शेतकरी राहुल जाधव यांच्या शेतात ऊसतोड करताना एका मजुराला हा बछडा आढळला.

जाधव यांनी तात्काळ वनविभाला ही माहिती दिली त्यानुसार घटनास्थळी पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल प्रज्ञा बनसोडे, आयटी पार्क हिंजवडीचे वनरक्षक पांडूरंग कोपनर, अॅनिमल रेस्क्यू टीम, वाईल्ड अॅनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक दाखल झाले. गोंधळामुळे घाबरून बिबट मादी बछड्याला घ्यायला आली नसावी असा अंदाज वनरक्षक पांडुरंग कोपनर यांनी व्यक्त केला.

मात्र, त्या बछड्याला मातेची गरज असल्याने बछडा ज्या ठिकाणी सापडला त्याच ठिकाणी सायंकाळी त्याला सोडण्यात आलं आणि कॅमेरे सेट केले गेले याद्वारे त्यांची निरीक्षणं नोंदविली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये असं आवाहन पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केलं आहे. तसेच जोपर्यंत मादी बछड्याला घेऊन जात नाही तोपर्यंत दोन-तीन दिवस ऊसतोड बंद ठेवण्याच्या सूचना वन विभागाने शेतकरी जाधव यांना दिल्या आहेत.

बछड्याला मानवाचा हात लागला आणि त्याचा वास मादीला आल्यास ती त्यांना स्वीकारत नाही अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिल्याने पिलांना हाताळताना कमालीची खबरदारी घेण्यात आली. हातात कापडी व रबरी हँड ग्लोव्हज घालूनच त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -