Saturday, October 4, 2025

वधारले सोन्याचे भाव! वर्षभरात ७५०१ रुपयांनी महागलं सोन

वधारले सोन्याचे भाव! वर्षभरात ७५०१ रुपयांनी महागलं सोन

जाणून घ्या सध्याचे चांदी व सोन्याचे भाव

मुंबई : सण तसेच लग्नसराईचे दिवस चालू असताना सोन्याला चांगलीच झळाली मिळाली आहे. दिवसेंदिवस सोन्याचे दर चढे आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात सोन्याच्या दर चांदीपेक्षा तिप्पट वेगाने वाढले आहेत. आयबीजेएनं ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सोन्याचा भाव ९८४ रुपयांनी वाढून ६७२५२ रुपयांनी वाढून उच्चांक स्तरावर पोहोचला आहे. तर चांदीचे भाव ७५ रुपयांनी वाढून ७२१२७ पर्यंत गेले आहेत.

वर्षभरापूर्वी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९७३१ रुपये प्रति १० ग्राम होती. तर २८ मार्च रोजी सोन्याची किंमत ६७२५२ रुपयांनी वाढून ती आजवरच्या उच्चांक स्तरावर पोहोचली आहे. ३१ मार्च २०२३ रोजी चांदीची किंमत प्रति किलो ७१५२८ रुपये होती. वर्षभरात चांदीच्या दरात २५४५ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या चांदीचे दर ७२१२७ रुपयांवर आहेत. मार्च महिन्यात सोन्याच्या दराला विक्रमी तेजी आली आहे.

एलकेपी सिक्योरिटीज रिसर्च अॅनालिसीस विभागाचे उपाध्यक्ष जितीन त्रिवेदी यांनी सांगितल्याप्रमाणे, व्याजदरांबाबत सकारात्मक दृष्टीकोनादरम्यान सोन्याचे दर उच्चांकी स्तरावर होत्या. परंतु डॉलरच्या निर्देशकात वाढ झाल्यामुळे त्यावर दबाव येऊ शकतो असे त्रिवेदी यांनी म्हटले. पूर्वी चांदीची किंमत २४.५० डॉलर्स प्रति औंसवर होती. त्या दरात किरकोळ भर होऊन २४.५५ डालर्स प्रति औंसवर आहे.

Comments
Add Comment