मुंबई: मीठ खाल्ल्याने शरीराला सोडियम मिळते. जर शरीरात सोडियमची कमतरता असेल तर अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते. शरीरात मीठाचे प्रमाण योग्य आहे की नाही? यासाठी टेस्टही असतात.
सोडियमची कमतरता असल्यास ही टेस्ट
सोडियम शरीराचे तापमान योग्य करण्यासोतच जेवण पचवण्याचेही काम करते. जर तुम्हाला तुमचे आरोग्य हेल्दी ठेवायचे असेल तर शरीरात सोडियमची पातळी व्यवस्थित असायला हवी. कारण याच्या कमतरतेमुळे अनेक आजार शरीरात प्रवेश करू शकतात.
शरीरात सोडियमचे प्रमाण योग्य आहे की नाही यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करतात. रक्ताच्या तपासणीने सहज समजते की शरीरात सोडियमचे प्रमाण किती आहे.
सीरम सोडियम टेस्ट
ही एक प्रकारची रक्त तपासणी आहे ज्याच्या मदतीने सोडियमची पातळी तपासता येते. शरीरात कोणता आजार आहे हे या तपासणीवरून समजते.
टॉयलेटमध्ये सोडियम टेस्ट
यात शौचाची तपासणी केली जाते की रक्तामध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे.
प्रोसीजर टेस्ट
जेव्हा डॉक्टरांना वाटते की किडनीशी संबंधित आजार अथवा इन्फेक्शन आहे तेव्हा ही टेस्ट केली जाते. यामुळे आजाराचा तपास करता येतो.