Sunday, July 14, 2024
HomeदेशLoksabha Election: आचारसंहिता उल्लंघनाबाबत ७९ हजाराहून अधिक तक्रारींचा उलगडा

Loksabha Election: आचारसंहिता उल्लंघनाबाबत ७९ हजाराहून अधिक तक्रारींचा उलगडा

भारतीय निवडणूक आयोगाकडे cVigil ॲपद्वारे तक्रारी दाखल

नवी दिल्ली : निवडणूकीचे वारे वाहू लागले असताना सर्व पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की, आचारसंहिता लावली जाते. मात्र निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाकडे सीव्हीआयजीआयएल (cVigil) ॲपद्वारे ७९ हजार हून अधिक तक्रारी मिळाल्या आहेत. त्यापैकी ९९ टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

भारत निर्वाचन आयोगाने सांगितल्याप्रमाणे बेकायदेशीर बॅनर होर्डिंगबाबत ५८,५०० तक्रारी, पैसे, भेटवस्तू आणि दारूच्या वितरणाबाबत १,४०० तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तीन टक्के तक्रारी मालमत्तेच्या नुकसानीच्या होत्या. गुंडगिरीच्या ५३५ तक्रारींपैकी ५२९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. निषिद्ध कालावधी नंतरच्या प्रचारा संबंधित एक हजार तक्रारी दाखल होत्या. बंदुकांचे प्रदर्शन आणि धमकावण्याबाबत ५३५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ५२९ तक्रारींचे निराकरण केले आहे. शिवाय, १००० तक्रारी निषिद्ध कालावधीच्या पलीकडे प्रचारासाठी करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ स्पीकर्स वापरल्याचा समावेश असल्याचे आयोगाने सांगितले.

सीव्हीआयजीआयएल (cVIGIL) हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ज्यावर नागरिकांना राजकीय गैरवर्तन घटनांच्या तक्रारी करता येतात. मतदान पॅनेलने म्हटले आहे की सीव्हीआयजीआयएल (cVIGIL) एक प्रभावी साधन बनले आहे आणि निवडणूक पर्यवेक्षण आणि प्रचारातील गोंधळ कमी करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -