Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

कै.भास्करराव स्मृतिप्रीत्यर्थ शास्त्रीय मैफीलीचे आयोजन

कै.भास्करराव स्मृतिप्रीत्यर्थ शास्त्रीय मैफीलीचे आयोजन

नवी मुंबई : शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेले आणि शास्त्रीय संगीताची परंपरा आपल्या गायकीतून निर्माण करणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक पंडित डॉ. प्रकाश संगीत यांनी आपले वडील आणि गुरू, कै. भास्करराव संगीत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार 31 मार्च रोजी, सायंकाळी 6 वाजता, वाशी येथील योग विद्या निकेतनमधे शास्त्राrय संगीत मैफीलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध बासरीवादक पं. संतोष संत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दरम्यान, ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्यासाठी त्यांनी ग्वाल्हेरला जाऊन कुंडल गुरू आणि राजाभैया पूछवाले यांच्याकडे गायकीचे धडे गिरवले. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्धा या आपल्या मूळ गावी परतल्यानंतर भास्कररावांनी ब्रिटिश सरकारची नोकरी न पत्करता आर्थिक धस सोसून खाजगी शाळेत संगीत अध्यापनाला सुरुवात केली.

1940 साली त्यांनी शिवानंद संगीत विद्यालयाची स्थापना करून संगीत प्रचार आणि प्रसार करत शेकडो विद्यार्थी तयार केले. भास्करराव संगीत सेवाग्रामला, तिथल्या आश्रमवासियांना भजनावली शिकवण्यासाठी जात असत. निस्पृहपणे अनेक वर्षे त्यांनी हे दायित्व स्वीकारून आनंदाने पार पाडले.

सदर कार्यक्रमात पं. डॉ. प्रकाश संगीत स्वत, तसेच त्यांचे सुपुत्र डॉ. चैतन्य शास्त्राrय गायन सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम विनामुल्य असून अधिक माहितीसाठी नंदिनी नारायणी, मो.नं. 9511649570 यांच्याशी संपर्क साधावा.

Comments
Add Comment