Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीMukhtar Ansari : ६१ हून अधिक गुन्हे, पाच वर्षे आमदार, कुख्यात गँगस्टर...

Mukhtar Ansari : ६१ हून अधिक गुन्हे, पाच वर्षे आमदार, कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

मुख्तारच्या हत्येचा तुरुंगात रचला होता कट?

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदा कारागृहात (Banda Jail) तुरुंगवास भोगत असलेल्या कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा (Gangster Mukhtar Ansari) मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याने तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुख्तार अन्सारीला काल संध्याकाळी राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आलं होतं. त्याला उलट्या होत होत्या आणि दवाखान्यात आणलं तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. त्याच्यावर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

काल संध्याकाळी अन्सारी यांची तब्येत खालावल्याची बातमी आली, तेव्हापासूनच गाझीपूर येथील त्याच्या घराच्या परिसरात लोक जमा होऊ लागले होते. अन्सारीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर उत्तर प्रदेशात संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच अन्सारी ज्या मऊ जिल्ह्यातील होता तिथे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. अन्सारीच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच अलीगढ, फिरोजाबाद, प्रयागराज, कासगंजसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी निमलष्करी दलांसोबत फ्लॅग मार्च काढला.

६१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल, पाच वेळा आमदार

मुख्तार अन्सारीला २०२२ मध्ये शिक्षा झाली होती. त्यानंतर पुन्हा दोन प्रकरणात अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मुख्तार अन्सारीवर ६१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. बांदा आणि गाजीपूर भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

मुख्तार अन्सारी समाजवादी पक्षाकडून पाच वेळा आमदार राहिला होता. तो तुरुंगातूनही गँग चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. मुख्तार अन्सारी याचा एक भाऊ विद्यमान खासदार आहे. उत्तरप्रदेश सरकारने मुख्तार अन्सारीवर कारवाई करत जवळपास ६०५ कोटींची संपत्ती केली होती. तसेच त्याचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय सरकारने बंद केले होते.

मुख्तारच्या हत्येचा तुरुंगात रचला कट?

गेल्या वर्षी मुख्तार अन्सारी यांचा मुलगा उमर अन्सारी याने त्याच्या वडिलांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असं म्हटलं होतं की, अन्सारी यांना त्यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती आणि बांदा तुरुंगात त्यांच्या हत्येचा कट रचला जात होता. मुख्तार अन्सारी यांना विषारी औषध देण्यात आले असल्याचा आरोप मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर मुलाने केला आहे. या प्रकरणात चौकशीची मागणी करत न्यायालयात जाणार असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान, मुलाने केलेल्या विषबाधेच्या आरोपानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -