Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रमनोरंजनताज्या घडामोडी

Kartiki Gaikwad : कुणीतरी येणार येणार गं... लिटिल चॅम्प कार्तिकी होणार आई!

Kartiki Gaikwad : कुणीतरी येणार येणार गं... लिटिल चॅम्प कार्तिकी होणार आई!

डोहाळेजेवणाचा व्हिडीओ आला समोर


मुंबई : 'सा रे ग म प' या गाण्याच्या शोचं अत्यंत गाजलेलं पर्व म्हणजे 'लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs). या शोमधील सर्वच लिटिल चॅम्प्स आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. या शोमधून घराघरांत पोहोचलेली आणि त्या पर्वाची विजेती गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad). कार्तिकी आपल्या गाण्याचे अनेक कार्यक्रम करत असते. तसेच अनेक मराठी चित्रपटांतून गाणी व मालिकांची शीर्षकगीते तिने गायली आहेत. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यातच कार्तिकीने आता तिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची व गोड बातमी दिली आहे. कार्तिकी लवकरच आई होणार आहे. नुकतंच तिचं डोहाळेजेवण पार पडलं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे.


कार्तिकी चार वर्षांपूर्वी २०२० मध्ये रोनित पिसेसोबत लग्नबंधनात अडकली. या दोघांचं अरेंज मॅरेज आहे. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी आई होणार आहे.


कार्तिकीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ fillamwala या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.



हिरव्या रंगाची साडी आणि पारंपरिक दागिने


कार्तिकीचे खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. पारंपरिक पद्धतीने कार्तिकीचं डोहाळे जेवण करण्यात आलं. डोहाळे जेवणासाठी कार्तिकीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. चेहऱ्यावर दिसून येत असलेल्या ग्लोमुळे कार्तिकीचं सौंदर्य आणखीच खुलून आलं होतं.






 










View this post on Instagram























 

A post shared by fillamwala (@fillamwala)





कार्तिकीच्या डोहाळे जेवणात ती आणि तिचा नवरा रोहित ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले. कार्तिकीने या खास कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची जरीची सुंदर साडी नेसली होती तर रोहित शेरवानीमध्ये दिसला. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी पारंपरिक दागिने घातले होते.

Comments
Add Comment