मुंबई: एप्रिल महिन्यात उन्हाच्या झळा कडक होतात. याचमुळे अनेक जण थंड वातावरण असलेल्या ठिकाणी जाणे पसंत करतात. मात्र अनेकदा सुट्ट्यांमुळे आणि बजेटच्या कारणामुळे जाऊ शकत नाहीत. तुम्हीही या उन्हाळ्यात थंड वातावरण असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहेत तर बजेट फ्रेंडली हिल स्टेशन तुम्हाला सांगत आहे. उन्हाळा हा असा ऋतू आहे जेव्हा मुलांचे आई-वडील टेन्शन फ्री असतात कारण त्यांना सुट्टी असते आणि अशा वेळेस कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लान बनवता येतो.
दक्षिण भारतातील सुंदर डोंगराळ भाग म्हणजे उटी त्याला उधागमंडलम असेही म्हटले जाते. ते तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतरागांमध्ये स्थित आहे. तेथील थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे संपूर्ण वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. येथील हिरवळ आणि उंचच उंच पर्वतांची सुंदरता यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात.
कूर्ग
कूर्ग हे सुंदर शहर कर्नाटक राज्यात स्थित आहे. येथे धबधबे, डोंगराळ भाग, कॉफीच्या बागा प्रसिद्ध आहेत. येथे तुम्ही कॉफीच्या बागांमध्ये फिरू शकता. येथे ट्रेकिंग, कँपिंग आणि रिव्हर राफ्टिंग यासारखे गेम्सही आहेत. कोडगू येथे फिरण्यासाठी योग्य काळ हा ऑक्टोबर ते जून पर्यंत आहे.
मुन्नार
केरळमधील मुन्नार हे अतिशय प्रसिद्ध आणि पर्यटकाच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील चहाचे मळे अतिशय प्रसिद्ध आहेत. याशिवाय डोगरांमध्ये ट्रेकिंग करण्याची मजाच काही वेगळी असते. मु्न्नारला भेट देण्याची योग्य वेळ ही सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत आणि जानेवारी ते मेपर्यंत आहे. यावेळेस येथील वातावरण अतिशय आल्हाददायक असते. येथील जवळचे विमानतळ कोची आहे आणि रेल्वे स्टेशन एर्नाकुलम आहे.