तामिळनाडू : तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ड्रविड मुन्नेत्र कझगम पक्षाचे नेते, खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी खासदार गणेशमूर्ती यांचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती यांचं तिकीट कापल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खासदार गणेशमूर्ती यांना २४ मार्चला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार गणेशमूर्ती यांना रुग्णालयात तपासल्यानंतर आयसीयूमध्ये दाखल केलं होतं. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. पुढे त्यांना कोयंबटूरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. खासदार गणेशमूर्ती यांच्या तब्येतीविषयी माहिती घेण्यासाठी मंत्री एस मुथुसामी, भाजप आमदार डॉ. सी सरस्वती, अन्नाद्रमुक नेते केवी रामलिंगम हे रुग्णालयात पोहोचले होते.
तीन वेळा संसदेत निवडून आलेले गणेशमूर्ती यांनी एमडीएमके पक्षातील अनेक पदे निभावली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते तामिळनाडूमधील इरोड या लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. या मतदारसंघात डीएमके पक्षाने उमेदवार उभा केला तर तिरुचिमधील जागा एमडीएमके यांना देऊ केली. एमडीएमके पक्षाचे महासचिव वाइको यांचा मुलगा दुरई वाइको यांना उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे, खासदार गणेशमूर्ती यांनी नाराजीचा सुर मारला होता.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…