मुंबई : सायन उड्डाणपुल पाडकामाची तारीख पुन्हा लांबणीवर आले आहे. दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा, माहिमची जत्रा अशा कारणांमुळे सध्य स्थितीत सायन उड्डाणपुलाचे पाडकाम स्थगित केले असून मध्यरात्रीपासून पाडकाम पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. पुढील तारीख अद्याप निश्चित नसल्यामुळे उड्डाणपुलाचे पाडकाम खोळंबणार आहे. तर पुलाचे बांधकामही पुढे लटकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्रिटीशकालीन मध्य मार्गावरील सायन उड्डाणपुल वाहतुकीसाठी धोकादायक असून त्याचे पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सुरवातीला माहिमची जत्रा नंतर दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परिक्षेनंतर उड्डानपुलाचे काम हाती घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. तर २७ मार्च मध्यरात्रीपासून पुल पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अद्यापही काही परीक्षा उर्वरित असल्यामुळे पुल तोडू नये अशी मागणी करण्यात येत आहे. पूल पाडण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि वाहतुकीचे आयोजन करण्यात आले असले तरीही पुलाचे पाडकाम तारीख निश्चित नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.