Saturday, June 21, 2025

आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी, स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला आर्थिक देणगी!

आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी, स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला आर्थिक देणगी!

नवी मुंबई(प्रतिनिधी)- मरावे परी कर्तिरूपी जगावे या प्रमाणे करावे गावातील. दयानंद भास्कर तांडेल यांनी आपले वडील कै. भास्कर तुकाराम तांडेल यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला रु.१२१२१२/- देणगी स्वरूपात देऊन, आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याच्या वसा पुढे सुरू ठेवला आहे. बेलापुर पट्टीतील करावे या गावाची धार्मिक, वारकरी संप्रदाय व संस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातच तांडेल कुटुंब धार्मिक, सामजिक शैक्षणिक कार्यासाठी परिचित आहे.


कै. भास्कर तुकाराम तांडेल यांच्या सामजिक कामाचा वसा हा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगा दयानंद तांडेल यांनी पुढे चालू ठेवला आहे. आपल्या वडिलांच्या पाचव्या स्मृतिदिन निमित्त त्यांना अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळयांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला रु.१२१२१२/- देणगी स्वरूपात दिली.


यावेळी स्व. सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव श्री. विनय सिंधुताई सपकाळ, स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे, सिडको एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल, समाजसेवक सुभाष म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment