Sunday, May 11, 2025

देशताज्या घडामोडीराजकीय

Kangana Ranaut : काँग्रेसच्या नेत्यांना कंगना चोख उत्तर देईल!

Kangana Ranaut : काँग्रेसच्या नेत्यांना कंगना चोख उत्तर देईल!

कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर हेमामालिनी यांची प्रतिक्रिया


मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौतला (Kangana Ranaut) भाजपाने (BJP) हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मंडी मतदारसंघातून लोकसभेचं (Loksabha) तिकीट दिलं आहे. तेव्हापासून कंगना प्रचंड चर्चेत आली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कंगनाला लक्ष्य करत तिच्याविरोधी भूमिका घेतली. कंगनाही त्यावर सातत्याने पलटवार करते. दरम्यान, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोकसभा खासदार हेमामालिनी (Hema Malini) यांनी कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर भाष्य केलं आहे. 'काँग्रेसच्या नेत्यांना कंगना चोख उत्तर देईल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


हेमामलिनी या २०१४ पासून भाजपा पक्षातून लोकसभेत मथुरा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना कंगनाबाबत आपलं मत व्यक्त केलं. कंगना राजकारणात आल्याबद्दल त्यांनी तिचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


हेमामलिनी म्हणाल्या, "कंगना रानौत ही एक चांगली अभिनेत्री आहे आणि गुणी मुलगी आहे. आपल्या हक्कासाठी ती पूर्ण इंडस्ट्रीसोबत लढली. मला खात्री आहे की, ती राजकारणातही चांगली कामगिरी करेल. काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल जे काही सांगितले ते पूर्णपणे चुकीचं आहे. कंगना त्यांना चोख पद्धतीनं उत्तर देईल", असं हेमामलिनी म्हणाल्या.




Comments
Add Comment