नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठी(loksabha election 2024) काँग्रेसने उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या या यादीत एकूण १४ नावांचा समावेश आहे. हे उमेदवार एकूण चार राज्यांतील आहेत. यात झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील जागांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याविरोधात मध्य प्रदेशच्या गुना जागेवरून राव यादवेंद्र सिंह यांना संधी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात काँग्रेसने विदिशा प्रताप भानू शर्मा यांना उमेदवार बनवले आहे.
झारखंड (खूंटी)- कालीचरण मुंडा
झारखंड (लोहरदगा) – सुखदेव भगत
झारखंड (हजारीबाग) – जय प्रकाश पटेल
मध्य प्रदेश (गुना)- राव यादवेंद्र सिंह
मध्य प्रदेश (दमोह)- तरवर सिंह लोधी
मध्य प्रदेश (विदिशा)- प्रताप भानू शर्मा
तेलंगाना (अदीलाबाद)- एस कुमारी चैलिमला
तेलंगाना (निजामाबाद)- टी जीवन रेड्डी
तेलंगान (भोंगीर) – सी किरण कुमार रेड्डी
तेलंगाना(मेदक)- नीलम मधु
उत्तर प्रदेश (गाजियाबाद)- डॉली शर्मा
उत्तर प्रदेश (बुलंदशहर)- शिवराम वाल्मिकी
उत्तर प्रदेश (सीतापुर)- नकुल दुबे
उत्तर प्रदेश (महराजगंज)- वीरेंद्र चौधरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने कोणाला दिली उमेदवारी?
काँग्रेसने याआधी उत्तर प्रदेशातील ९ उमेदवारांची घोषणा केली होती. यात पक्षाचे अध्यक्ष अजय राय पंतप्रधान मोदींविरोधात पुन्हा निवडणूक लढवतील. चौथ्या यादीत वाराणसीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. १९ एप्रिलला लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तर ४ जूनला निकाल घोषित केले जाणार आहेत.