
अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेले आणि कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. या बैठकीत विजय शिवतारेंच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.