Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीArvind Kejriwal : हायकोर्टाकडून दिलासा मिळाला तरी केजरीवालांच्या समस्या संपेनात!

Arvind Kejriwal : हायकोर्टाकडून दिलासा मिळाला तरी केजरीवालांच्या समस्या संपेनात!

आणखी सात दिवसांच्या कोठडीची ईडीकडून मागणी

नवी दिल्ली : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात (Liquor policy scam) आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे. त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi Highcourt) फेटाळली असली तरी त्यांना आणखी सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने (ED) कोर्टात केली आहे.

केजरीवाल यांच्या आधीच्या ईडी कोठडीची मुदत गुरुवारी संपली आहे. त्यानंतर कोठडीची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची मागणी ईडीने केली आहे. गुरुवारी केजरीवालांच्या कोठडीवर राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. मात्र कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली.

दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती काल समोर आली होती. ईडी कोठडीमध्ये असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल लो झाली आहे. मागच्या काही तासांपासून शुगर खाली-वर येत असल्याची माहिती आहे. केजरीवाल यांचं शुगर लेव्हल ४६ पर्यंत खाली गेलं आहे. अशा पद्धतीने शुगर खाली जाणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -